गिरीराज सिंहांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांना जातीय वक्‍तव्य केल्याबद्दल आज निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. गिरीराज सिंह यांनी सकृतदर्शई आदर्श आचार संहितेतील तरतूदींचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान धार्मिक संदर्भ आणला जाऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे. आपल्या वक्‍तव्यावरील स्पष्टिकरणासाठी गिरीराज सिंह यांना 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.

बिहारमधील बेंगुसराइ जिल्ह्यामध्ये 24 एप्रिल रोजी निवडणूक प्रचारादरम्यान गिरीराज सिंह यांनी मुस्लिमांविरोधात वक्‍तव्य केले होते. या सभेला भाजप अध्यक्ष अमित शहा हे देखील उपस्थित होते. निवडणूक आयोगाने या वक्‍तव्याची स्वतःहून दखल घेतली आणि गिरीराज सिंह यांना नॉटीस बजावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.