बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक सेलेब्सने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग पार्टी होत असल्याचा दावा केला आहे. आता “कामसूत्र’मधील अभिनेत्री शर्लिन चोप्राने खुलासा केला की, पार्टीचे निमंत्रण देऊन अनेकवेळा ड्रग ऑफर करण्यात येते. याबाबतचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शर्लिन चोप्राने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती योगा करताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी चेन स्मोकर होते. परंतु ऑक्टोबर 2017मध्ये मी स्मोकिंग (धूम्रपान) करण्याचे सोडून दिले. ड्रग्सपासून मी कायमच दूर राहिली आहे. इंडस्ट्रीच्या पार्टीत बोलवून अनेक वेळा ट्रेवर ड्रग्स ऑफर करण्यात येतेव परंतु ते घ्यायचे नाही.’ सध्या शर्लिनची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत शर्लिन सांगते की, आपण सतत मला माझ्या फिटनेसच्या सीक्रेटबाबत विचारत असतात. तर माझे सीक्रेट आहे न्यूट्रिशन, अनुशासन आणि योगा. दरम्यान, यापूर्वी सर्लिनने बॉलीवूडमधील कास्टिंगबाबतही धक्कादायक खुलासे केले होते.