…तर पुणे पालिकेवर पुन्हा झेंडा फडकवू

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील : “संघटनपर्व’ कार्यकर्ता मेळावा

पुणे – एकत्रितपणे काम करताना वाद, मतभेद होतात. आपले घर मोडावे असे घरातली मंडळी म्हणत नाहीत. त्यामुळे घरातली भांडणे घरातच ठेवावीत, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिला. पक्ष आणि कार्यकर्त्यांनी संवाद व नियोजन व्यवस्थित ठेवल्यास पालिकेच्या निवडणुकीत यश मिळेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपने बुधवारी “संघटनपर्व’ कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सभागृह नेता धीरज घाटे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, “राज्यात 23 महानगरपालिका आहेत. त्यात 97 भाजपचे आमदार असून संघटन आणि पालिकेतील सत्ता यांच्यात योग्य समन्वय ठेवण्याची गरज आहे. आशियातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे पुणे हे शहर आहे. अशावेळी बापट, काकडे आणि मिसाळ या त्रिमूर्तींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करायचे असल्याचे पाटील यांनी सूचित केले. चांगल्या कामाला तडा देण्याचे काम काहीजण करत आहे. अशावेळी सर्वांनी एकत्रितपणे काम करुन पक्षबांधणीसाठी झटण्याची आवश्‍यकता आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.