मंचर -बिबट्याच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीज समस्या आणि इतर मागण्यांबाबत राज्यशासन व महावितरण कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. या निषेधार्थ बिबट्या प्रवण क्षेत्रात लावलेल्या पिंजऱ्याशेजारी बसून आंदोलन करणार आहे.
सोमवारी (दि. 17) पासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाची सुरुवात राजुरी (ता. जुन्नर) येथून करणार आहे, अशी माहिती ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी एकलहरे येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जुन्नर तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे, डॉ.बाळकृष्ण घंगाळे, सुभाष मावकर, वैशाली अडसरे, सीताराम चव्हाण उपस्थित होते.
या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव यांच्याकडे केली होती. मागण्या पूर्ण न केल्याने सोमवार (दि.17) पासून आंदोलन करण्यात येणार आहे, असेही औटी यांनी यावेळी सांगितले.