शिरूरमधील 10 गावांत 25 जण संक्रमित

एकूण रुग्णसंख्या 649 : नागरिक भेदरले

शिरूर -शहरासह तालुक्‍यात 10 गावांत 25 बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. 

त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील बाधितांचा आकडा 649 इतका झाला असून आजही बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यात तालुक्‍यातील मोराची चिंचोली, कर्डेलवाडी, भांबर्डे गावांमध्ये नव्याने प्रथमच बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे.

शहरात भाजीबाजार येथील 62 वर्षे पुरुष, तर गुजर मळा येथे पन्नास वर्षे पुरुष, असे दोघेजण बाधित आढळले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा 118 इतका झाल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा 4, शिक्रापूर 6, कारेगाव 6, मोराची चिंचोली 1, विठ्ठलवाडी 1, कर्डेलवाडी 1, भांबर्डे 1, तर्डोबावाडी 1, वडु बुद्रुक 1, शिरूर शहरात 3 तसेच तालुक्‍यातील 10 गावांत 25 बाधित आढळले आहेत.

शहरात अनेक बाधित रुग्णांच्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले नाही. अनेक ठिकाणी नागरिक संपूर्ण परिसर प्रतिबंध करू देत नसल्याचे दिसून आले आहे. बाधितांच्या नातेवाइकांची तपासणी आरोग्य प्रशासनाच्या वतीने झालेली नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील नागरिक शहरात खुलेआम फिरताना दिसत आहेत.

काही बाधित रुग्णांच्या घरी रुग्ण आढळल्यानंतर एकदाच नगरपरिषदेचे कर्मचारी येऊन गेले. परंतु आरोग्य विभाग पुन्हा त्या बाधित रुग्णांच्या घरी गेले नाहीत. त्या रुग्णाची हिस्ट्री याबाबत कुठलीही माहिती घेत नसल्याचे दिसून येत आहे. शिरूर शहरात खुलेआम झाले का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.