मुंबई : राज्यातील राजकारणात आणखी एका ठाकरेंची आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आले असल्याचे दिसत आहे.
अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. ‘गरज पडल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढवू शकतो’, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. ते त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे यांचे सुपुत्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.‘गरज पडल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढवू शकतो’असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
ठाकरे कुटुंबीयांमध्ये सगळ्यात आधी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकली देखील. त्यानंतर आता आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन आता चर्चा रंगत आहे.
अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यावेळी औरंगाबादमध्ये असताना त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. या चर्चेदरम्यान, त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींसोबत मनसेच्या रणनितीबाबतही माहिती दिली. राज ठाकरे यांचा मी मुलगा नसतो, तर कदाचित मी राजकारणात आलोच नसतो. सध्याची राजकीय स्थिती पाहता मला राजकारण यायची इच्छाच झाली नसती, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
अमित ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी दौरे करत असून मनसैनिकांशीही संवाद साधत आहेत. आगामी पालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका या सगळ्यांच्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.