मुंबई – नोरा फतेही आपल्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते. फार कमी वेळात नोराने बॉलिवूडममध्ये आपले पाय रोवत दमदार यश मिळवल आहे. तिचा सध्या व्हायरल होत असलेला डान्स व्हिडीओ खूपच अफ़लातुन आहे. नोराने स्वतः आपल्या इंस्टावरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात नोरा एका बीचवर डान्स करताना दिसते.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही बीचवर एका व्यक्तीसोबत अतिशय हॉट डान्स करताना दिसत आहे. यावेळी नोरा डेनिम शॉर्ट्स आणि ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. चाबूक डान्स आणि केसांची स्टाईल यामुळे नोराचा लूक अजून खुलून दिसत आहे. नोराचा नॅचरल लूकमधील साधा डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय. ‘कॉल मी एव्हरी डे’ असं कॅप्शन यावेळी नोराने दिल आहे.
View this post on Instagram
नोराच्या या किलर स्टाईलवरून तिचे चाहतेही नजर हटवू शकत नाहीत. काही तासांत या व्हिडिओला 3.3 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा फतेहीचे ‘माणिक’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. याशिवाय अलीकडेच ती FIFA 2022 मध्ये देखील परफॉर्म करताना दिसला होता.