मुंबई – सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याची प्रसिद्ध फ्रेंचाइजी टायगर 1 आणि 2 रिलीज झाली आहे. चाहते या मालिकेतील तिसऱ्या चित्रपट टायगर 3 ची वाट पाहत आहेत, मात्र सलमान खानने या चित्रपटाबद्दल मोठा धमाका केला आहे. दबंग खानने सोशल मीडियावर या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. मात्र टायगर 3 साठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
सलमान खानने काही दिवसांपूर्वी टायगर 3 ची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. आता सलमान खानने दिवाळीपूर्वी मोठा धमाका केला असून पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या दिवाळीला त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि सलमान खान देखील दिसणार आहेत. सलमानने सोशल मीडियावर ट्विट करून त्याच्या चित्रपटाच्या नव्या तारखेबद्दल माहिती दिली आहे.
सलमान खानने टायगर 3 चा लूकही इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत टायगर 3 दिवाळी 2023 ला रिलीज होईल असे लिहिले आहे. टायगर हिंदी सोबतच तामिळ आणि तेलुगु भाषेतही रिलीज होणार आहे. दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणे म्हणजे सध्या या चित्रपटासाठी चाहत्यांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा आहेत आणि चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत.