भिगवण पोलीस ठाण्याजवळ सदनिकेत 70 हजारांची चोरी

भिगवण – भिगवण पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थ रेसिडेन्सी सोसायटीमधील प्लॅटचा दरवाजा तोडून 70 हजारांची रोकड आणि घड्याळ आणि पाकीट चोरट्यांनी पळविले. याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ विशाल बनसोडे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

भिगवण येथील समर्थ रेसीडन्सीमधील डॉ. विशाल शिवाजी बनसोडे यांचा फ्लॅट आहे. शुक्रवारी (दि. 27) रात्री दोनच्या सुमारास बनसोडे यांच्या प्लॅटच्या दरवाजाला लावलेले सेफ्टी डोअरचे लॉक उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोख रक्‍कम व एक घड्याळ व पाकीट व त्यामधील कागदपत्रे, असा एकूण 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली रतिलाल चौधर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.