सांगली : गेल्या दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णा नदीचे बॅकवॉटर येरळा नदीवरील वसगडे (ता. पलूस) येथील बंधाऱ्यापर्यंत पोहचले आहे. येरळा नदी दुथडी वाहू लागली आहे. मात्र, वसगडे बंधाऱ्यावरील ढापे काढले नसल्यामुळे बंधाऱ्यास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसगडे बंधाऱ्यातील ढाप्यामुळे पाठिमागे पाण्याचा फुगवटा वाढत आहे. त्यामुळे काठावरील पाणी शेतात शिरले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचे बॅकवॉटर येरळा नदीवरील वसगडे येथील बंधाऱ्यापर्यंत पोहचले आहे. येरळा नदी दुथडी वाहू लागली आहे. मात्र, वसगडे बंधाऱ्यावरील ढापे काढले नसल्यामुळे बंधाऱ्यास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसगडे बंधाऱ्यातील ढाप्यामुळे पाठिमागे पाण्याचा फुगवटा वाढत आहे. त्यामुळे काठावरील पाणी शेतात शिरले आहे.