पाईट -खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी यात्रा पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान आदिमाया शक्ती श्री भवानी मातेच्या उत्सवाचे औचित्य साधून भलवडी येथे निकाली कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या तांबड्या मातीत मर्दानी खेळ असलेल्या कुस्त्यांचा फड रंगला आणि शड्डांचे आवाज, पट, कोल्या, दसरंग, ढाक, कालाजंग, बांगडी, स्वारी, आतली-बाहेरची लांग, उपट, ढुंगणी, मुळी, धोबी इत्यादी डाव-प्रतिडावांचे सुरेख प्रदर्शनाने पंचक्रोशीतल्या तमाम कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
दुपारी दोन वाजता सुरु करण्यात आला यावेळी काका पवार तालीम पुणे, मोतीबाग तालीम कोल्हापूर, आगरवाल तालीम पुणे, मामासाहेब मोहळ तालीम, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून पहिलवान आले होते. पंच म्हणून रोहिदास गिऱ्हे, शांताराम सावंत, संतोष गिऱ्हे, सोपान गिऱ्हे, शामकांत गिऱ्हे, अशोक गिऱ्हे, संदीप शिवेकर यांनी काम पाहिले.