न्यूयॉर्क : पृथ्वीवरील सर्वात वृद्ध कासव जोनाथन हे असल्याची औपचारिक घोषणा आधीच करण्यात आली आहे. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कासवाची नोंद काण्यात आली आहे. या कासवाचे वय 190 वर्ष आहे. हे कासव इतिहासाचा साक्षीदार आहे. हे कासव पृथ्वीवरील सर्वात वृद्ध असलेला जिवंत प्राणी आहे.
जोनाथन दक्षिण अटंलांटिकमधील सेंल हेलेना येथे आपला 190 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. नेपोलियनच्या मृत्यूनंतर या कासवाचा जन्म झाला होता. जोनाथन या कासवाच्या जन्माबाबत स्थानिक प्रशासनाकडे कोणतेही दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. जोनाथनचे वय याहून अधिक असण्याचीही शक्यता आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी कासवाच्या कवचावर केलेल्या संशोधनाच्या आधारे या कासवाचा जन्म 1832 मध्ये झाला असावा.
जोनाथन हे सेंट हेलेनाच्या गव्हर्नरचे अधिकृत निवासस्थान असलेल्या प्लांटेशन हाऊस येथे आरामदायी जीवन जगत आहेत. यासोबतच डेव्हिड, एम्मा आणि फ्रेड अशी आणखी तीन वृद्ध कासवंही येथे राहतात. 1838 मध्ये जोनाथनचा पहिला फोटो काढण्यात आल्याचे सांगितलं जातं.
सेंट हेलेना येथे जोनाथनच्या वाढदिवसानिमित्त विशेष टपाल तिकिटाच्या प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी जोनाथनच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन होईल. यावेळी केक कापला जाईल. जोनाथनच्या केअर टेकरने 2017 मध्ये एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जोनाथनला गाजर, काकडी, सफरचंद आणि नाशपाती आवडतात.
जोनाथन 190 वर्षांचा आहे. त्याला सुमारे 50 वर्ष वय असलेल्या एम्मा नावाच्या मादी कासवाचा सहवास आवडतो. जोनाथन एम्माच्या प्रेमात आहे, तर तो कधी इतर मित्रांसोबतही खेळतो. तत्कालीन गव्हर्नर लिसा फिलिप्स यांनी सांगितले की, जोनाथनने अजूनही मादी कासवांच्या संगतीला प्राधान्य देतो. या वर्षाच्या सुरुवातीला, जोनाथनच्या नावाची जगातील सर्वात जुना जिवंत प्राणी म्हणून गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. आता जोनाथनच्या नावावर सर्वात जुने कासव म्हणून विक्रम आहे.