जगातील पहिल्या करोनामुक्त झालेल्या इस्रायलमध्ये पुन्हा करोनाचा धुमाकूळ; लस घेणारेच बाधित

नवी दिल्ली : जगभरात गेल्या दीड वर्षापासून करोनाने थैमान घातला आहे.  आतापर्यंत जगभरात १७ कोटीहुन अधिक लोकांना याची बाधा झाली होती.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपला देश करोनमुक्त झाल्याचे  इस्रालयने सांगितले होते. तसेच आऊटडोर आणि इनडोर  मास्क न घालण्याची सूट दिली होती. जगातील पहिला देश होता जो मास्क मुक्त झाला होता. पण एका आठवड्यानंतर करोनाने पुन्हा एकदा इथे हाहाकार घालण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर लस घेणारे लोकच करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे  बळी ठरत आहे.

इस्रायलने आपल्या लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले आहे. यानंतर इस्रालयने सर्व निर्बंध घटवण्यासह मास्क न घालण्यास सूट दिली होती. मग एका आठवड्यानंतर इस्रायलमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे. करोनाचा धोकादायक डेल्टा व्हेरियंट लस घेऊन झालेल्या लोकांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलांचे लवकरात लवकर लसीकरण केले जावे, अशी मागणी केली जात आहे.

सोमवारी इस्रालयमध्ये १२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिलमध्येनंतर एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण सोमवारी आढळले. जानेवारी महिन्यांत इस्रालयमध्ये करोनाचा कहर सुरू होता. तेव्हा इस्रालयमध्ये दिवसाला १० हजार रुग्णांची नोंद होत होती. परंतु त्यावेळेस नेतन्याहू सरकारने वेगाने लसीकरण करून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला. पण आता सर्व निर्बंध हटवल्यामुळे रँडम चाचणी दरम्यान अनेक शाळांमध्ये बाधित प्रकरण आढळले.

इस्रायल वृत्तपत्र हारेट्जच्या मते, इस्रालयच्या दोन शाळेत चाचणी दरम्यान लसीचे दोन घेणाऱ्या नऊ शिक्षक कोरोनाबाधित आढळले. इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन उद्रेक होण्याचा इशारा दिला.

ते म्हणाले की, ‘देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत आहे. कारण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सक्तीने चाचणी केली जात आहे. तसेच त्यांनी आपल्या नागरिकांना परदेश दौरा कमीत कमी करण्याचा सल्ला दिला आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.