किव्ह – युक्रेनमधील आक्रमणानंतर आक्रमक झालेल्या पाश्चिमात्य राष्ट्रांमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी रशियाच्या आण्विक हल्ला कृती दलाला अतीसतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे अवघ्या जगावर अणुयुध्दाचे मळभ जमा झाले आहे.
माझ्यासह रशियावर पाश्चिमात्य राष्ट्रे आणि नाटो राष्ट्रांनी कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांसह नाटो आक्रमक वक्तव्ये करत आहे, असे सर्वात वरीष्ठ ाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुतीन म्हणाले. पुतीन यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आणि सेना प्रमुखांना आण्विक हल्ला दलाला युध्दासाठी तयार राहण्याचे आदेश दिले.
पुतीन यांच्या आदेशामुळे पाश्चिमात्य राष्ट्रे आणि रशियात आण्विक युध्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. युक्रेनवरील हल्ल्यात कोणत्याही राष्ट्राने थेट सहभाग घेतला तर त्या राष्ट्राला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अद्याप त्यांचे अंतिम धोरण जाहीर केले नसले तरी शीतयुध्दोत्तर काळापुर्वीचे सोव्हिएट युनियन त्यांना बनवायचे असल्याने युक्रेनमध्ये स्वत:चे बाहुले आणायचे आहे, असा कयास पाश्चिमात्य देशातील वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा आहे.
युक्रेनसाठी सामरिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या रोमानियापर्यंतची महत्वाची बंदरे रशियाने ताब्यात घेत युक्रेनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. खेरसन आणि बेर्डीअंस्क ही बंदरे ताब्यात घेतल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी केला आहे. या भागातील विमानतळांचा ताबाही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
रशियाचे या युध्दात साडेतीन हजार सैनिक मारले गेले असून त्यांचे मृतदेह त्यांच्या देशात नेण्याचे आवाहन युक्रेनने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीला केले आहे.
दरम्यान, अमेरिकेने 35 कोटी डॉलर्सचे युध्द साहित्य युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात रणगाडा रोधक शस्त्रे, लष्करी वाहने आणि लहान शस्त्रांचा समावेश आहे. जर्मनीनेही क्षेपणास्त्रे आणि रणगाडा रोधक शस्त्रे युक्रेनला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
किव्हमध्ये पहाटे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. रशियाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिक तळघरात रहात असून भूमिगत रेल्वे स्थानके नागरिकांनी भरून गेली आहेत. “काल रात्री मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आणि इमारतींवर तोफगोळ्यांचा आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.
युक्र्रेनच्या मोठ्या शहरात घुसताना मॅठ्या संघर्षाला सामना करावा लागतआहे. युक्रेन सरकारने लष्करी अनुभव असणअऱ्या कैद्यांना देशाकरीता लढाण्यासाठी मुक्त केले आहे, अशी माहिती देण्यात आली.