नवी दिल्ली – युक्रेनमध्ये रशियाचा मुकाबला करण्यासाठी पाश्चात्य देशांचे सैन्य पाठवण्याचा प्रस्ताव अजूनही उघडा आहे, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी म्हटले आहे. युक्रेनला सैन्य दलाची मदत करण्याच्या प्रस्तावावर युरोपातील देशांच्या नेत्यांच्या एकत्रीकरणामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला आता दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही चर्चा करण्यात आली.
या एकत्रीकरणाला युरोपातील २० देशांचे नेते पॅरिसमध्ये उपस्थित आहेत. रशियाने हे युद्ध जिंकू नये, म्हणून शक्य असलेल्या सर्वकाही करण्याचा निर्धार या देशांनी केला असल्याचे मॅक्रॉ यांनी सांगितले.
युक्रेनला प्रत्यक्ष सैन्य पाठवण्याच्या मुद्यावर अद्याप युरोपातील देशांमध्ये एकमत झालेले नाही. मात्र जर आवश्यकता भासल्यास त्याची शक्यता नाकारली देखील नाही, असेही मॅक्रॉ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
पॅरिसमधील एकत्रीकरणाला ज्रमीनीचे चॅन्सेलर ओलाफ स्चोल्झ आणि पोलंडचे अध्यक्ष अँद्रेज डुडा यांच्यासह बाल्टिक देशांचे नेतेही उपस्थित होते. यापैकी कोणते देश युक्रेनला सैन्य पाठवण्यास अनुकूल आहेत, हे सांगण्यास मॅक्रॉ यांनी गोपनीयतेसाठी नकार दिला. युक्रेनला एकमुखी पाठिंबा देण्यासाठी युरोपातील देशांनी एकत्र यायला हवे, यासाठी मक्रॉ यांनीच पुढाकर घेतला होता.
युक्रेनवर अधिक व्यापक हल्ले करण्याची योजना रशिया करत आहे. रशियाचे मोठे लक्ष्य पोलंड सारखा मोठा देश देखील असू शकतो. म्हणूनच या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युरोपातील इस्टोनिया, लिथुआनिया आणि लॅटविया सारख्या छोट्या देशांनीही पुढे येण्याची गरज आहे, असेही मक्रॉ यांनी सांगितले.