पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या परीक्षेचा निकाल येत्या चार दिवसात लागणार आहे.
राज्य मंडळाने 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरम्यान, कला संचालनाने एप्रिलमध्ये शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल मे अखेरीस लागला आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांची याची विभागीय मंडळाकडे सादर केली. हे गुण दहावीच्या निकालात समाविष्ट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
इयत्ता दहावीच्या निकालाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. ते पूर्ण झाले की निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दि. 20 जूनच्या आसपास निकाल जाहीर करण्यात येणार आहे.