पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेत आंबेगाव बु. येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा सायन्स विभागाचा 100 टक्के, तर कॉमर्स विभागाचा 99 टक्के निकाल जाहीर झाला.
ज्युनिअर कॉलेजच्या कॉमर्स विभागामध्ये नेहा खंडाळे हिने 92 टक्के गुण मिळवून प्रथम, ईश्वरी खोसे हिने 91 टक्के गुण मिळवून द्वितीय तर राजिव देवासी याने 89 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स विभागामध्ये पार्थ गरुड याने 89.17 टक्के गुण मिळवून प्रथम तर, प्रीतम बंगाळे याने 87.17 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, हर्षित इनानी याने 86.50 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी दररोजच्या अभ्यासाबरोबर ऑनलाइन त्याचबरोबर ऑफलाइन ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे वेळोवेळी निरसन केल्याने त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्यानेच आम्ही चांगले गुण मिळवू शकलो असे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 12 वीच्या परीक्षेत उत्तुंग निकालाची परंपरा याहीवर्षी कायम राखल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, जुनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सुनिता यादव, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी अभिनंदन केले आहे.