‘चंपा’ हा शब्द भाजपच्याच नेत्यांची निर्मीती

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : आपण एकदा भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी त्यांनीच चंद्रकांत पाटील यांच्या नावावरून ‘चंपा’ असा शब्द उच्चारला होता. या मंत्र्यांचे नाव मी निवडणुकीनंतर सांगेन, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

मी एका कामासाठी भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही बोलत असताना त्या मंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा असे म्हणण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. मी निवडणुकीनंतर हे मंत्री कोण होते, त्यांचे नाव सांगेन. पण हा शब्द मी तयार केलेला नाही. चंद्रकांत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनीच तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रचार करताना अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख चंपा असा केला होता. त्यानंतर त्यांनी हा खुलासा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.