ग्रामस्थांचा आरोप : तहसीलदारांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्द
राजगुरूनगर – वडगाव (ता. खेड) येथील देवस्थानची धनदांडग्यींनी बळकवलेली जमीन परत देवस्थानाला मिळावी, अशी मागणी वडगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे. याबाबत तहसीलदार ते मुख्यमंत्र्यापर्यंत ग्रामस्थांनी निवेदने दिली आहेत.
वडगाव येथील श्री कमळेश्वर व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या मालकीची गट क्रमांक 142 मधील 1 हेक्टर 21 आर म्हणजे तीन एकर जमीन होती. ती 1992 मध्ये धनदांडग्यांनी लाटली आहे. त्यावेळीही ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्ट यांनी ठराव करून जमीन संपादित करू नये यासाठी विरोध केला होता. कोणत्याही विश्वस्थांची सही संमती घेतलेली नव्हती गावाचे व देवस्थानचे परस्पर कागदपत्र तयार करून खोट्या साह्य करून देवस्थानची जमीन बळकावली आहे.
ही जमीन संपादनात बसत नसतानाही तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी या जमिनीचे जाणून बुजून त्यावेळी संपादन केल्याचा आरोप देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केला आहे. देवस्थान ट्रस्ट तेव्हापासून ग्रामस्थ ही
जमीन पुन्हा मिळण्यासाठी लढा देत आहेत.
सरपंच दीपाली गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रासमसभा घेण्यात आली होती या ग्रामसभेत रामदास पाटोळे हे सूचक होते, तर मेघराज पाटोळे यांनी अनुमोदन दिले होते. या ग्रामसभेत श्री कमळेश्वर व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची जमीन परत मिळण्याची मागणी केली आहे. वारंवार (पान 3 पहा)8