नगर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक अध्यक्ष संघाची राज्यस्तरीय महामंडळाची सभा 19 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे उदघाटन होणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष आबासाहेब जगताप व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच बारामती येथे भेट घेतली . शिक्षकांचे मागील पाच वर्षात रखडलेले प्रश्न मंत्र्यांचे खातेवताप झाल्यानंतर सोडविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार या भेटीत महामंडळाच्या सभेचे आयोजन करण्याची सूचना शरद पवार यांनी केली.
या महामंडळ सभेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून ते शासनदरबारी सोडविण्यासाई प्रयत्न केले जाणार आहेत.