जगातील सर्वात उंच इमारतीच्या यादीत दुबईतील बुर्ज खलिफाचा पहिला नंबर लागतो. जगातील श्रीमंत व्यक्तींना बुर्ज खलिफासारख्या इमारतीत आपले घर असावे अशी इच्छा असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दुबईमध्ये भव्य आणि सुंदर दिसणाऱ्या इमारतीत स्वतःचे घर घेतले आहे. या यादीत आता अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या नावाचा समावेश झाला आहे. शर्लिनने नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत: ला बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे.
याबाबत स्वतः शर्लिन चोप्राने सोशल मीडिया अकाउंटवरुन माहिती दिली. शर्लिनचे घर सर्व सुविधांसह अतिशय भव्य आणि सुंदर आहे. शर्लिन चोप्रा लवकरच मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच करणार आहे.
शर्लिनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हा फोटो सुद्धा तिने बुर्ज खलिफामध्येच क्लिक केला आहे. शर्लिनच्या फ्लॅटबाहेरचाच हा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे.
शर्लिनने बुर्ज खलिफासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी मोठी रक्कम दिली आहे. अन्य वेबसाईटवरील माहितीनुसार बुर्ज खिलामध्ये घराची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे. मात्र शर्लिनने हे घर किती रुपयांना घेतले याबाबतची माहिती जाहीर केलेली नाही.