नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर क्रुडचे दर 104 डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे भारतात चिंता निर्माण झाली आहे. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील मात्र पुरवठ्यावर कसलाही परिणाम होणार नाही असे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
10 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल जाहीर जाणार होणार आहेत. त्यामुळे 10 मार्चपर्यंत तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. भारताला तेलाचा मुख्यत्वे मध्य आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेच्या पुरवठा होतो. या भागावर आक्रमणचा कसलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे भारताला तेल मिळणारच नाही असे होणार नाही असे या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 14 ऑगस्ट 2014 नंतर प्रथमच तेलाचे दर इतक्या उच्च पातळीवर गेले आहेत.
भारत तेलाचा वापर करणारा जगातील सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. सौदी अरेबिया, इराक आणि इतर मध्यपूर्व देशातून भारताला 63 टक्के तेल येते, आफ्रिकेतून 14 टक्के तर उत्तर अमेरिकेतून 13 टक्के तेल येते. रशियातून युरोपला दहा टक्के नैसर्गिक वायू जातो. त्यामुळे युरोपवर मात्र नैसर्गिक वायूच्या कमतरतेचे संकट निर्माण होणार आहे. भारत आपल्या गरजेच्या फक्त एक टक्के तेल रशियातून आयात करतो तर दीड टक्के एवढा कोळसा रशियातून आयात करतो. ह्या आयातीवर परिणाम होऊ शकतो.
तेल पुरवठादार देशाकडून आश्वासन
भारताने ज्या देशांना तेलाचे ऑर्डर दिल्या आहेत त्या सर्व देशांनी तेल पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले आहे. त्याचबरोबर कुठल्याच देशाने तेल पुरवठा पुढे ढकलणार जाईल असे सांगितलेले नाही. क्रुडच्या किमती 75 डॉलर गृहीत धरून सध्याचे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरविण्यात आले आहेत. आता क्रुडचे दर 103 डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे त्या प्रमाणात निवडणुकांनंतर पेट्रोलचे दर वाढू शकतात