Petrol Diesel Price । लोकसभा निवडणुकीआधीच आता घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. देशात पुढच्या एक ते दोन दिवसांत आचारसंहिता लागू शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक प्रचंड कामाला लागले आहेत. असं असताना आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर प्रत्येकी २ रूपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. आज नवे दर शुक्रवारी (दि.१५ मार्च) सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे.
सार्वजनिक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन दरांचा आढावा घेऊन नियमितपणे देशातील इंधन दरांमध्ये बदल करतात. मात्र, त्या प्रक्रियेत जवळपास दोन वर्षे खंड पडला होता. आता सार्वजनिक कंपन्यांनी दर कपात केल्याने देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रूपयांना आणि डीझेल ८७.६२ रूपयांना उपलब्ध होईल.
Petrol Diesel Price । केंद्रीय मंत्री हरदीप पुरी नेमकं म्हणाले ?
‘केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे हे स्वस्त दर उद्या सकाळी 6 वाजेपासून देशभरात लागू होणार आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवर (X) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी घट करुन एकदा पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, मोदींचं कोट्यवधी भारतीयांच्या परिवाराचं हित आणि सुविधांवर लक्ष्य आहे’ असेही ते म्हणाले आहे.
हे वाचाल का ? ‘कधी अभिनेत्रींचे पाय चाटले, तर कधी… ‘ राम गोपाल वर्माची राजकारणात एंट्री; ‘या’ पक्षातून उतरणार लोकसभेच्या रिंगणात