नगर – महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्यावतीने अध्यक्ष वसंत लोढा यांनी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भेट घेऊन त्यांना पतसंस्था फेडरेशनच्यावतीने होणाऱ्या महिला बचत गटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिली.
नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात नगर किंवा शिर्डी येथे महिलांच्या बचत गटाच्या भव्य मेळाव्याचे नियोजन सध्या चालू आहे. बचत गटांना पतपुरवठा करुन महिला सबलीकरण या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. या भव्य मेळाव्यास उपस्थित राहण्याचे विनंती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे निमंत्रण स्विकारले असून, नोंव्हेंबर महिन्यात नगर दौरा करु, असे लोढा यांनी सांगितले.