नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकमय वातावरण झाले आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्सनीही सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.
अमिताभ बच्चन म्हणाले कि, आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, एक अत्यंत दुःखदायक बातमी आली आहे. एक अत्यंत प्रबळ राजकीय नेत्या, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि अदभूत प्रवक्त्या. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना. सुषमाजी यांची जागा न भरून निघण्यासारखी आहे, असे ट्विट करताना त्यांनी एक सुषमा स्वराज यांच्या सोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
T 3251 –
‘मृदुभाषी, सम्मोहक वक्ता,
मिलनसार, दुखहर्ता।
सुषमाजी जैसों का रिक्त स्थान कभी नहीं भरता।।’ ~ Ef V pic.twitter.com/upWSXevwaH— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 7, 2019