पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन – तीन दिवसांपासून चांगलाच गारठा वाढला असून शनिवारी (दि. 28) पारा आणखी घसरला. त्यामुळे सकाळी चांगलीच बोचरी थंडी नागरिकांनी अनुभवली.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने तापमानात घसरण सुरू झाली असून परिणामी गारठा वाढत आहे. आठवड्याच्या सुरवातीला ऑक्टोबर हिटचे चटके बसत होते.
मध्यावर गारठा सुरू झाला. त्यात आणखी वाढ होत सकाळी चांगलीच वाढ झाली. त्यामुळे इतके दिवस कपाट बंद असलेले स्वेटर बाहेर निघाल्याचे दिसले. तसेच सकाळी शाळेत जाताना तसेच कमावर जाणाऱ्यांनी स्वेटर, मफलर, शॉल पांघरून जाताना नागरिक दिसत होते.