बांदा – यूपीतील बांदा जिल्ह्यातील बिसंडा पोलीस हद्दीतील अमलोहरा या गावात एका स्थलांतरित मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरत येथून परतलेल्या मजुराने आपल्या घरी पोहोचल्यानंतर गळफास घेतल्याने, त्याच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मृताच्या वडिलांनी सांगितले की, त्याचा मुलगा आणि सून गुजरातमधील साड्यांच्या कंपनीत छपाई करण्याचे काम करीत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने ते गावी परतले होते.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, शवविच्छदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असले तरी पोलीस याप्रकरणाची कसून तपासणी करीत आहेत.