महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. या वृत्तानंतर सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी येत आहे.
View this post on Instagram
Kabhi Denim, Kabhi Dhoti, Kabhi Sherwani.. Apni yahi Kahani.. #bollywood #bollywoodsongs
यातच बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या मुलाला करोनाची लागण झाली आहे. इंग्रजी वृत्तपत्राचा माहितीनुसार, अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा ध्रुवला करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र परदेशी प्रवास करण्याच्या उद्देशाने त्याने चाचणी करून घेतली. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, करोना रिपोर्ट आल्यानंतर ध्रुवला घरातच क्वारंटाइन करण्यात आलं असून पुढील उपचार करण्यात येत असल्याची माहिती अभिजीत यांनी दिली आहे.