मुंबई – शिवसेनेचा ठाकरे गट जनतेच्या मनातील प्रश्न समजून घेण्यासाठी युट्यूब चॅनलवर या पॉडकास्टचे लवकरच प्रसारण करणार आहे. आवाज कुणाचा या नव्या पॉडकास्टचे प्रसारण करणार आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे ट्विट करत माहिती दिली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,’लवकरच घेऊन येत आहोत, जनतेच्या मनातले प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरं… ‘शिवसेना पॉडकास्ट’ स्वरुपात! “आवाज कुणाचा!” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत युट्युब पेजवर.’ असेही त्यांनी लिहिले आहे.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट
लवकरच घेऊन येत आहोत,
जनतेच्या मनातले प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरं…
‘शिवसेना पॉडकास्ट’ स्वरुपात!
“आवाज कुणाचा!”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत युट्युब पेजवर.https://t.co/hKCteKYfxy pic.twitter.com/avf1EhBNrJ— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 5, 2023