कॉंग्रेस-राष्ट्रवादीत एकवाक्‍यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा नाही

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांना कसरत करावी लागत आहे. त्यातच काल दिवसभर शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिवसभर काथ्याकूट झाला. पण निर्णयाप्रती कॉंग्रेस येऊ शकली नाही. तिकडे राज्यपालांनी ही मुदतवाढ नाकारली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत एकवाक्‍यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा शक्‍य नसल्याचे म्हटले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत निवडणूक लढवली. त्यामुळे आम्हा दोघांना एकत्रच निर्णय घ्यावा लागेल. सोमवारी आम्ही कॉंग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. पण त्यांचे आमदार जयपूरमध्ये आम्ही इकडे, त्यामुळे लवकर संवाद होत नाही. कॉंग्रेस सोबत आलीच तरच मार्ग निघू शकतो.

स्थिर सरकारसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत एकवाक्‍याता असायला हवी. यासाठी किमान समान कार्यक्रम आखावा लागेल. आम्हाला जनतेला, माध्यमांना यामागचे कारणही सांगावे लागेल. जो काही निर्णय होईल तो एकत्रितपणे होईल. यासाठी आम्ही सोमवारी कॉंग्रेसशी संवाद साधला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. आम्ही एकटयाने हा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात काही गैरसमजही नाही. आम्ही एकत्रित लढलो होतो आणि अजूनही एकत्रितच आहोत, असेही पवार म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)