मुंबई – गायनाबरोबरच अभिनयातही स्वतःचं नाव कमावणारी मराठमोळी मुलगी म्हणजे ‘आर्या आंबेकर’. आर्या नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. आतापर्यंत तिने अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत.
आर्या आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतंच आर्याने सोशल मीडियावर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आर्याचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
या फोटोंवर आर्याच्या चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत असून, तिचं सोज्वळ सौंदर्य पाहून फॅन्स प्रेमात पडले आहे.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. तसेच, लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या सर्वांचे लक्ष वेधून घेते.
गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. गायनासह तिने ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली.