‘कौन बनेगा करोडपती’ च्या 11 व्या सीझनला मिळाला दुसरा करोडपती स्पर्धक

मुंबई : लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’चा 11 वा सीझन सध्या सुरू आहे. कार्यक्रमाची लोकप्रियता सुरुवातीपासूनच एका उंचीवर राहिली आहे. दरम्यान, यंदाच्या 11 व्या सीझनमध्ये सनोज राज या स्पर्धकाने 1 कोटी रुपये जिंकून सीझनचा पहिला करोडपती होण्याचा मान पटकावला होता. दरम्यान, सनोजनंतर आता या कार्यक्रमाला दुसरा करोडपती स्पर्धक मिळाला आहे. आंध्रप्रदेशमधल्या अमरावतीमधून आलेल्या बबिता ताडे या 1 कोटी जिंकणाऱ्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या आहेत.

एका सरकारी रुग्णालयात स्वयंपाक करण्याची जबाबदारी बबिता यांच्यावर आहे. या कामातून बबिता यांना महिन्याला केवळ दीड हजार रुपये मिळतात. या खेळात आपल्या ज्ञानाच्या जोरावार त्यांनी 1 कोटींपर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे जिंकलेल्या रकमेतून एक मोबाईल फोन घेण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. आर्थिकस्थिती बेताची असल्याने घरात मोबाईल नाही. घरात एकच मोबाईल फोन आहे. त्यामुळे अडीअडचणीला संपर्क साधण्यासाठी मी जिंकलेल्या रकमेतून एक मोबाईल विकत घेईन असे त्या म्हणाल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.