राजगुरूनगर (प्रतिनिधी) : वडगाव पाटोळे ता.खेड येथे मुंबई वरून गावी आलेल्या एका वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .बळीराम गाढवे यांनी दिली. त्यामुळे आता तालुक्यातील रुग्णांची संख्या ७ झाली आहे.
संबंधित वृद्ध व्यक्ती मुंबई वरून पाच दिवसांपूर्वी गावाला आला होता. त्याला लक्षणे दिसल्याने त्याची स्वब टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आज (दि. २५) पॉझिटिव्ह आला. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
मुंबई पुणे येथून ४ थ्या लॉक डाऊनच्या काळात सुमारे साडेचार हजार नागरिक मुंबईमधून तालुक्यात आपापल्या गावी आले आहेत. रेडझोन मधून आलेल्या सुमारे १४०० लोकांना त्यांच्या गावांमध्ये क्वारोंटाईन केले आहे. तर अनेक गावात आलेले मुंबई पुणेकर गावात खुले आम फिरत आहेत. त्यामुळे करोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान राजगुरूनगर परिसरात दोन व्यक्ती संशयित असून त्यांचे स्वब रिपोर्ट येणे बाकी आहे. कडूस ता. खेड येथे मुंबईवरून आलेल्या एक व्यक्ती पुन्हा मुंबई ला परत मुंबईला गेल्यानंतर तिथे पॉझिटिव्ह आला असल्याने कडूमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारटाईन केले आहे.