रियाध – सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान हे पुढील महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. जी-20 गटाच्या बैठकीसाठी इंडोनेशियामध्ये बाली येथे जाण्यापूर्वी ते भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
14 नोव्हेंबर रोजी पहाटे ते भारतात येणार असून त्याच दिवसी संघ्याकाळी बाली येथे रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार युवराज ही धावती भेट देणार आहेत.
युवराजांच्या भारत भेटीपूर्वी सौदीचे उर्जा मंत्री अब्दुलअजिज बिन सलमान यांनी या आठवड्यात भारताला भेट दिली होती. तेल उत्पादक देशांची संघटना “ओपेक’ने तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय त्यानंतर घेतला होता.
सौदीच्या उर्जा मंत्र्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांशीही ऑनलाईन चर्चा केली होती. भारत भेटीवर आले असताना सौदीच्या उर्जा मंत्र्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, तेल मंत्री हरदीप सिंग पुरी आणि उर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्याशीही चर्चा केली होती.