मुंबई – हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेद्वारे येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात २०४.४ मिलीमीटर एवढ्या प्रचंड पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाने याबाबत एका अधिकृत सूचनेद्वारे माहिती दिली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जुलै २०१९ ते २ जुलै २०१९ या कालावधीमध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर २ जुलै २०१९ ते ३ जुलै २०१९ या कालावधीत यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.