काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींनी केला ‘या’ नेत्याला फोन

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. निवडणुकीतील प्रभावाची जबादारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर अनेकांनी राहुल गांधींची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते.

मात्र, तरी सुद्धा राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यातच आता सोनिया गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एका नेत्याला फोन केल्याची खबर बाहेर आली आहे.

संसदेच्या अधिवेशनानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे. सोनिया गांधींनी हा फोन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.