प्राथमिक चाचणीत दोघांना बाधा झाली असण्याची शक्यता
हैदराबाद : हैदराबादमध्ये आणखी दोन जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे तेलंगणाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान हैदराबादमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या कंपनीची दोन्ही कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
नव्याने कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या दोघांच्या रक्ताचे आणि बडक्याचे नमुने पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबरोटरीकडे पाठवण्यात आले आहेत. या दोन जणांपैकी एक जण इटलीला जाऊन आला होता. तर दुसरा सोमावारी कोरोना झाल्याचे स्पष्ट झालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आला होता. सरकारी गांधी रुग्णालयात या दोघांच्या प्राथमिक चाचाणी पॉझिटिव्ह आल्या अहेत. त्यांचे अंतिम अहवाल पुण्यातून गुरूवारी मिळण्याची शक्यता आहे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही लागण झालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 40 जणांना वैद्याकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सोमवारी 47 जणअंची चाचणी घेण्यात आली. त्यातील 45 जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तर दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, कोरोनाबाधीत कार्यरत असलेल्या कंपनीची शहराच्या रहेजा माईंडस्पेस आणि ब्राईटस्पेस भागातील कार्यालये बंद करून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची नियमित तपासणी केली जात आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
तेलंगणा सरकारने विलगता कक्षात तीन हजार खाटांची सोय केली असून जवळपास 300 जणांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. हा विषाणू पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.