राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज सहा वाजेपर्यंत १४ व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्या असून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या १६९ झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे पस समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
खेड तालुक्यात आठवठाभरात कोरोना बाधित व्यक्तीची संख्या दुपटीने वाढली आहे. राजगुरूनगर, चाकण शहरात ती झपाट्याने वाढत आहे. राजगुरूनगर शहरात आज सर्वाधिक ७ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. राजगुरूनगर शहरात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत शहरासह चाकण,पिंपरी बु.,सावरदरी प्रत्येकी एक व्यक्ती, आळंदी व दावडी येथे प्रत्येकी दोन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
तालुक्यात दररोजची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना राबविण्यात येत असून शहरासह ग्रामीण भागात नागरिक स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापर्यंत तालुक्यात ५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६४ व्यक्ती कोरोनावर मात करून बऱ्या झाल्या आहेत तर १११ व्यक्तीवर करोनाचे उपचार रुग्णालयात सुरू आहेत. तर बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५४ व्यक्तींचे करोना स्वब अहवाल येणे बाकी आहेत.
खेड तालुक्यात ग्रामीण भागात १२३ रुग्ण संख्या झाली आहे.चाकण नगर परिषद हद्दीत २०, आळंदी नगर परिषद हद्दीत ९ आणि राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत १७ कोरोना बधितांची संख्या झाली आहे.