शिरूर : निमोने (ता.शिरूर) गावात तलवारी च्या साहाय्याने दहशत निर्माण करून दहा लाखाचा दरोडा टाकणाऱ्या गुंड अक्षय काळे टोळीतील फरारी दरोडेखोर अखेर गुन्हे अन्वेषण विभागाने केला जेरबंद केल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातील निमोने येथील दहा लाखांची लूट करणारे गुंड अक्षय काळे याचे टोळीतील आठ दरोडेखोर यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने शिताफीने पकडले होते . त्यांचा हा फरार साथीदार यालाही गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे.
शिवा उर्फ किशोर छबु साळुंके (राहणार बोरीपार्धी तालुका दौंड ) या फरार दरोडेखोरास गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०१९ रोजी भरत काळे हे दिलीप जाधव यांच्या घरी भिशी असल्याने गेले होते.रात्री १० नंतर भीशीच्या पैशाचा लिलाव झाला. भीशीत मिळालेले दहा लाख रुपये रक्कम घेऊन ते स्वतः च्या दुचाकीवरून घराकडे निघालेले होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूस बिगर नंबर ची स्विफ्ट गाडी उभी असल्याचे दिसले. त्यानंतर १०० मीटर अंतर गेल्यानंतर अचानक उसाच्या कडेलगत पल्सर या दुचाकी वाहनांवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी काळे यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली.तसेच चार ते पाच चोरटे समोर येऊन उभे राहिले. यावेळी काहि क्षण काळे यांनी सदरील चोरट्यांशी प्रतिकार केला.यावेळी यातील चोरट्यांनी काळे यांना तलवारीचा धाक दाखविल्याने काळे हे घाबरून गेले. ही संधी साधत चोरट्यांनी काळे यांच्या जवळील रोख रक्कम दहा लाख रुपये, दोन मोबाईल व जवळील कागदपत्रे चोरून पळ काढला होता यातील आठ आरोपींना पकडण्यात आले होते.
दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींचा साथीदार शिवा उर्फ किशोर छबु साळुंके राहणार बोरीपार्धी तालुका दौंड जिल्हा पुणे हा त्याचे इतर साथीदारांना अटक केल्यापासून फरारी होता. आरोपी पोलिसांना गुंगारा देत असलेकारणाने त्याला पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके नेमण्यात आली होती.
शिवा उर्फ किशोर साळुंके हा केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक कापरे, सहा. फोै. दत्तात्रय गिरीमकर पो हवा उमाकांत ,पो हवा जितेंद्र पानसरे, पो.ना राजू मोमीन पो ना जनार्दन शेळके, पो.ना विजय कांचन, पो. शि. धिरज जाधव, केडगाव रेल्वेस्टेशन परिसरात सापळा रचून पकडण्यात आले असून त्यास पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून शिरूर पो स्टे च्या ताब्यात दिले असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.