महापालिकेचे अंदाजपत्रक सोमवारी सादर होणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि.17) सादर होणार आहे. महापालिकेचे हे 38 वे अंदाजपत्रक असून आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे तीसरे अंदाजपत्रक असणार आहे. त्यामुळे या आगामी अंदाजपत्रकातून नवीन काय मिळणार, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्यासह समितीला हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते.

आगामी वर्षासाठीचे यंदा किती कोटींचे अंदाजपत्रक असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासियांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, यंदाचे अंदाजपत्रक फुगवट्याचे नसणार आहे, वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.