आहाराद्वारे वाढवा ऑक्सिजनची पातळी

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे महत्त्वाचे

लंडन –  भारतासह जगातील अनेक देशांमध्ये करोना महामारी च्या संकटाची तीव्रता वाढत असतानाच ऑक्सिजनची टंचाई वाढत आहे या पार्श्वभूमीवर या महामारी चा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यावर आहाराद्वारे भर द्यावा हा विषय समोर येत आहे मानवी शरीरातील रक्तामध्ये असलेल्या लाल पेशीं साठी हिमोग्लोबिन अतिशय महत्त्वाचा घटक असतो हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीरातील विविध अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो त्यामुळेच शरीरात ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन आता आहारतज्ञ करत आहेत.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे त्यासाठी पूरक असा आहार घ्यावा अशी सूचना आहार तज्ञांनी केली आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते पुरुषांसाठी 13.5 ग्रॅम प्रति डेस्सी लिटर आणि महिलांसाठी 12 ग्रॅम प्रति डेस्सीलिटर हिमोग्लोबिन ची गरज असते हार्वर्ड हेल्थ संस्था आणि अमेरिकेच्या फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन च्या माहितीनुसार शरीरात रक्तामध्ये हिमोग्लोबिनची योग्य पातळी राहावी यासाठी तांबे लोह विटामीन बीचे विविध प्रकार आणि बी 12 या जीवनसत्त्वांची गरज आहे.

शरीरात तांब्याचे प्रमाण योग्य राहावे यासाठी चॉकलेट काजू बटाटा मशरूम या वस्तू आहारात असाव्यात असे आहार तज्ञांनी सुचवले आहे रक्तातील लोहाची पातळी योग्य राहावी यासाठी चिकन मटण हिरव्या भाज्या बीन्स विविध प्रकारची कडधान्ये आहारात असावीत त्याशिवाय अंडी गाजर दुधी भोपळा व्हॅनिला आइस्क्रीम पालक यासारख्या वस्तू आहारात असाव्यात शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्ती आपल्या आहाराचे योग्य नियोजन करुन आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य ठेवू शकतात असेही या संस्थांनी म्हटले आहे

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.