बहुप्रतीक्षित ‘सत्यमेव जयते 2’ देखील ईदला रिलीज होणार नाही

मुंबई – करोनाच्या साथीमुळे सगळ्या बड्या कलाकारांचे सिनेमे पुढे ढकलले जात आहेत. अक्षय कुमारचा “सूर्यवंशी’, सलमान खानचा “राधे’ आणि “केजीएफ 2′ सारखे बिग बॅनर सिनेमे करोनामुळे अडचणीत आले आहेत. 

आता तर जॉन अब्राहमचा “सत्यमेव जयते 2′ देखील करोनामुळे यावर्षी ईद ला रिलीज केला जाणार नाही. करोनाच्या साथीमुळे “सत्यमेव जयते 2′ च्या निर्मात्यांनी रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

ईदच्या ऐवजी नंतर कधीतरी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. “सत्यमेव जयते 2′ मध्ये जॉन अब्राहम बरोबर दिव्या खोसला कुमार असेल. नेहमी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा सिनेमा रिलीज होतो. यावर्षी त्याला टक्‍कर देण्याचा जॉनचा प्रयत्न होता. पण आता ते शक्‍य होईल, असे दिसत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.