पुणे: भांडणे सोडवणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार

पुणे – भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आले. ही घटना खडकमाळ अळी येथील मनपा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहीत रागिर (20,रा.घोरपडे पेठ) याने फिर्याद दिली आहे. फुग्या उर्फ योगेश गाटे , सुशिल मिसाळ , आद्रया, भैय्या, करण उर्फ ठोब्या आगलावे, सनी शिंदे(सर्व रा.लोहीयानगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी रोहीतचा मित्र रेतिष व आरोपी यांच्यामध्ये आठ दिवसांपुर्व भांडणे झाली होती. ही भांडणे रोहीतने सोडवली होती. याचा राग सर्व आरोपींच्या मनात होता. शुक्रवारी रात्री रोहीत व ऋतीक हे मनपा कॉलनीतील रस्त्यावर थांबले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी रोहीतला शिवी हासडत आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारला. यानंतर फुग्याने आता “तुझी विकेटच काढतो’ म्हणत शर्टाच्या आत पाठिमागे लपवलेली तलवार काढली. या तलवारीने रोहीतवर वार केला. मात्र तो त्याच्या हाताच्या अंगठ्याला लागून गेला. यावेळी राहीतला वाचवण्यासाठी ऋतीकमध्ये पडला. मात्र आरोपींनी त्यालाही लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.