सातारा – एनकूळ ( ता. खटाव) येथील आरोग्य उपकेंद्रांत सुरू असलेल्या लसीकरणाच्या शुभारंभाला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे यांना न बोलवल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद व आ. शशिकांत शिंदे यांनी वडूज पंचायत समिती येथे आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी विधाते बोलत होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 18 रोजी एनकूळ ता. खटाव येथील आरोग्य उपकेंद्रांत करोना लसीकरणाचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाला एनकूळ गावच्या रहिवाशी व जिल्हा परिषदेच्या सभापती कल्पना खाडे यांना बोलवले नसल्याची तक्रार त्यांनी विधाते यांच्याकडे केली होती.
त्याची गंभीर दखल घेत विधाते यांनी कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनतर विधाते यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले.