जुना बाजार बंद केल्याने व्यापारांचे ठिय्या आंदोलन

पुणे – वाहतुकीस अडथळा ठरत असल्यामुळे जुना बाजार आता बंद करण्यात आला आहे. यामुळे विक्रेते आक्रमक झाले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

गेले वर्षानुवर्षे पुणे शहरातील शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेसपर्यंतच्या रस्त्यावर दर बुधवारी आणि रविवारी हा जुना बाजार भरण्यात येतो. या बाजाराच्या निमित्ताने अनेक दुकानदार आपली दुकाने रस्त्यावर मांडतात. परिणामी एका बाजूची वाहूतक बंद करावी लागते. त्याचा परिणाम हा वाहतूक कोंडीवर होतो. याबाबतच्या तक्रारी सुद्धा अनेकवेळा नागरिकांनी पोलीस व पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्‍तांनी वरील आदेश काढले आहेत. परंतु, शासनाने आधी विक्रेत्यांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.

दरम्यान, आता जुना बाजार परिसरात “नो पार्किग झोन’ व रविवारी, बुधवारी भरणाऱ्या जुना बाजारातील दुकाने रस्त्यावर लावण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर 30 दिवस या आदेशाची अंमलबजावणी होणार असून त्यानंतर या आदेशाबाबत पुनर्विचार केला जाईल, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)