राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आळंदीत निषेध सभा 

आळंदी – चाकण येथे गतवर्षी झालेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी सर्व पक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात तालुक्‍यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते; परंतु आंदोलनादरम्यान चाकण तळेगाव चौकात काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली;परंतु राजकीय दबावामुळे तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले याचा निषेध म्हणून आळंदीतील राष्ट्रवादीच्या वतीने भैरवनाथ चौकात निषेध सभा घेण्यात आली.

तर मोहिते पाटलांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे राज्याचे नेते डी. डी. भोसले, नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक मृदुल भोसले, साहेबराव कुऱ्हाडे, भाऊसाहेब कोळेकर, शशिकांत घुंडरे, सोमनाथ वहीले, धनंजय घुंडरे उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.