I.N.D.I.A Alliance Meeting : सत्ताधारी पक्षाला आगामी निवडणुकीत पायउतार करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आता 17 डिसंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज 6 डिसेंबरला होणारी इंडिया आघाडीची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. मिचाँग चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) इंडिया आघाडीची बुधवारी होणारी दिल्लीतील बैठक (I.N.D.I.A Alliance Meeting) रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होतं. (Congress) होती.
भाजप सरकार विरोधात एकत्र येत विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. पण, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षात फूट पडल्याचे म्हटले जात आहे. कारण ममता बँनर्जी आणि नितीश कुमार या बैठकीला अनुपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तामिळनाडूचे स्टॅलिनही गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक आता 17 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी नवी दिल्लीत 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली असून त्यात विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला झाला. तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिचॉंग चक्रीवादळामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले होते. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.