IPL 2024 (CSK vs PBKS Match Update) : आयपीएल 2024 मधील 49 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज आमने-सामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात सात विकेट्स गमावताना 162 धावा केल्या आहेत. आता पंजाब किंग्जला विजयासाठी 163 धावा कराव्या लागणार आहेत. पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करूनही सीएसकेला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. चेन्नईकडून कर्णधार रुतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 48 चेंडूत 62 धावा केल्या आणि या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
Innings Break!#CSK put up a competitive 162/7 courtesy of skipper’s fifty and former skipper’s finishing touches 🎯
Will #PBKS chase it down? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/EOUzgkMFN8 #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/XzkDv8TWGy
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2024
दुसरीकडे, अजिंक्य रहाणेने 24 चेंडूत 29 धावा करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा बॅटने कोणतीही जादू दाखवू शकले नाहीत, पण युवा फलंदाज समीर रिझवीने दबावाखाली 21 धावांची खेळी करत सीएसकेला संकटाच्या परिस्थितीतून सोडवले. पंजाबकडून अतिशय तगडी गोलंदाजी होती, पण शेवटच्या 5 षटकांमध्ये अर्शदीप सिंगपासून ते हर्षल पटेलपर्यंत सर्वांचीच धुलाई झाली.
चेन्नई संघाने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता 55 धावा केल्या होत्या. पण क्षेत्ररक्षण उघडताच धावांचा वेग मंदावला होता. मधल्या षटकांमध्ये संघाला केवळ 47 धावा करता आल्या. म्हणजेच पॉवरप्ले संपल्यानंतर सीएसकेच्या फलंदाजांना 54 चेंडूत केवळ 47 धावा करता आल्या, त्यामुळे 15 षटकांत 3 गडी गमावून 102 धावा झाल्या होत्या. मधल्या षटकांमध्ये सीएसकेच्या खेळाडूंना एकही चौकार मारता आला नाही हे आश्चर्यकारक होते. यानंतर पुढील 3 षटकांत 44 धावा झाल्यामुळे फलंदाजीत आक्रमकता दिसून आली. 18 षटकांत सीएसकेने 146 धावांपर्यंत मजल मारली होती. शेवटच्या षटकांमध्ये एमएस धोनीने 11 चेंडूत 14 धावांची खेळी करत चेन्नईला 162 धावांपर्यंत नेले.
पंजाबची गोलंदाजी…
राहुल चहर पंजाब किंग्जकडून खूप घातक गोलंदाज ठरला कारण त्याने 4 षटकात फक्त 16 धावा देत 2 बळी घेतले. तर हरप्रीत ब्रारने 4 षटकात 17 धावा देत 2 बळी घेतले. दरम्यान, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग प्रत्येकी एक विकेट घेण्यात यशस्वी झाले. अर्शदीपने आपल्या 4 षटकात 52 धावा दिल्या, त्यामुळे चेन्नईला 160 धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. तर कर्णधार सॅम करन खूप महागडा ठरला, त्याने 3 षटकात 37 धावा दिल्या.