नवी दिल्ली – सोमवारी मध्यरात्री पासून देशाची राजधानी दिल्लीत कडक लॉकडाऊन लागू झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील लॉकडाऊन पूर्वीच प्रत्येक दारूच्या दुकानासमोर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली होती. आठवडाभराचा स्टॉक खरेदी करण्यासाठी ही झुंबड उडाली.
या गर्दीमध्ये पुरुषांबरोबर महिलाही दारू घेताना दिसत होत्या. एका महिलेने तर “इंजेक्शन फायदा नही करेगा, यह अल्कोहोल फायदा करेगी… दवाई से मारे को असर नही होगा, पेग से असर होगा’ असं म्हटलं आहे. सध्या दारुचं महत्त्व सांगणारा या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिल्ली मधील हा लॉकडाऊन सोमवारी मध्यरात्री पासून पुढच्या सात दिवसांसाठी करण्यात आला आहे. इतर राज्यांप्रमाणे राजधानी दिल्लीतही कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. रोज कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.