लसीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय खायचे? जाणून घ्या एका क्लिकवर…

पुणे –  करोना संसर्ग वाढतच चालला आहे. दरम्यान, अनेकांनी करोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला आहे. लसीबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्‍न असतात. लसीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लस घेण्याच्या आधी आणि नंतर काय खावे हे जाणून घ्या. हार्वर्ड न्यूट्रीशियन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमा नायडू यांनी इंस्टाग्रामवरून सांगितले की, लसीचे जर काही दुष्परिणाम जाणवत असतील तर आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तसेच लसीकरणानंतर आणि अगोदर कोणते पदार्थ खायला हवे याबद्दलही त्यांनी माहिती सांगितलीय… हिरव्या भाज्या आहारामध्ये हिरव्या भाज्या असणे आवश्‍यक आहे. पालक, कोबी यांसारख्या पालेभाज्या व फळभाज्यांचा आहारामधील समावेश आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. कांदे आणि लसूण या दोन्ही गोष्टी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्‍त ठरतात.

कांदे व लसूण यांच्या सेवनामुळे आतड्यांमधील लाभदायक असलेल्या बॅक्‍टेरियाला पोषण मिळते. कांदे व लसूण यांचा आहारात समावेश करण्यासाठी आपण त्यांची लोणची अथवा सूप यांचा वापर करू शकतो. हळद आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये हळदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हळद ही शरीरावरील सूज कमी करते तसेच हळदीमुळे तणावापासूनदेखील मुक्‍ती मिळते.

म्हणूनच सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये हळदीचे सेवन करणे अधिक आवश्‍यक बनलं आहे. ब्लू बेरी ब्लू बेरी एक उत्तम नैसर्गिक अँटीऑक्‍सिडंट असून त्यामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढविण्यास देखील मदत करतात, दह्यासोबत ब्लू बेरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.